शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यापारी सद्दाम भाई यांचे निधन
शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यापारी सद्दाम भाई यांचे निधन
कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध भंगार चे व्यापारी तसेच हाजी मंगलकार्यालय चे मालक माजी नगरसेविका.नसीम सय्यद गांधीनगर यांचे पती हाजी हुसेन समा सय्यद ऊ.(सद्दाम भाई) यांचा अल्पशा आजाराने आज दिनांक 11.6.2026 रोजी रात्री 2.30 ला निधन झाले अंत यात्रा गांधीनगर मक्का मस्जिद चौक येथून निघेन
हाजी सद्दाम भाई सय्यद हे गोर गरीब लोकांना नेहमी मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते.
गोर गरीब लोकांना मदत करणे,सामाजिक उपक्रम राबवून जनतेची अहोरात्र सेवा करणे हेच धेय्य हाजी सद्दाम भाई यांचे होते.त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असल्याने कोपरगाव शहरावर शोककळा पसरली आहे.
सुप्रसिद्ध व्यापारी,निस्वार्थी समाजसेवक,शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक,अनेक व्यापारी,,सामाजिक संस्थांचे मार्गदर्शक म्हणून हाजी सद्दाम भाई सय्यद यांची ख्याती होती
गरीब लोकांना लग्न समारंभ,सामाजिक उपक्रमाची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी हाजी मंगल कार्यालयाची स्थापना केली, गरिबांची जान असल्याने सर्वच नागरिकांना आश्रु अनावर झाले आहे.
गोरगरिबांची बाजू कायम उचलून धरून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झटत राहणे हेच त्यांच्या आयुष्यातील धेय्य.कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सद्दाम भाई हे दिवसरात्र एक करीत असे.गोरगरिबांच्या आणि गावाच्या हितासाठी कायम झटणाऱ्या हाजी सद्दाम भाई यांची ” गोरगरीब जनतेचा कैवारी” म्हणून कोपरगाव शहरात ओळख आहे




