Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0 0 7 1 4 6

छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोपरगाव येथील छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संघाचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्च्याचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष शंकर बिऱ्हाडे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष जगदीश मोरे माजी नगरसेवक जयवंत मरसाळे किसान मोर्चाचे अध्यक्ष सतीश रानोडे आर.पी.आय मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष सुजल चंदनशिव ज्ञानेश्वर घोडेस्वार सुनील वाव्हाळकर दिपक पुडे राहुल भागवत संजय खरोटे आदींनी आपल्या स्वकष्टातून कमावलेल्या पैशांमधून नगरपरिषद शाळा क्रमांक ६ व गीता प्रशाला या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत करण्यात आले

 यावेळी छत्रपती शाहू महाराज महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित माणिक कदम सर यांनी केले यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ सविता साळुंके अनुराधा सोमोसे व इंगळे मॅडम तसेच गीता प्रशालेचे भाऊसाहेब थोरात सर व पाखरे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे व कंपास पेटीचे वितरण करण्यात आले

 याप्रसंगी शंकर बिऱ्हाडे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संघाच्या वतीने नगरपरिषद शाळा क्रमांक ६ व गीता प्रशाला या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते अण्णाभाऊंनी समाजातील गरीब दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी कार्य केले त्यांचे लेखन आणि विचार लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे आणि सामाजिक न्यायासाठी लढणारे अण्णाभाऊ यांनी ३२ कादंबऱ्या व १३ लघुकथा संग्रह आणि १ प्रवास वर्णन त्यांनी आपल्या लेखी द्वारे लिहिले आहे असे शंकर बिऱ्हाडे शेवटी म्हणाले यानंतर जगदीश मोरे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करण्यात यावा आणि त्यांची सुरुवात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावी अशी मागणी याप्रसंगी केली तसेच जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव हे गीत लोकशाहीरांनी आणि लिहिले यानंतर जयवंत मरसाळे म्हणाले की शिक्षणाच्या सध्याच्या युगात गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे शिक्षण घेत असताना आपण गरीब आहोत असे न मानता आपण चांगला अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे आपल्या शिक्षकांचे व आपल्या शाळेचे नाव उज्वल करून आपले आयुष्य उज्वल करावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत गेलेले लोकशाहीर अण्णाभाऊ रशिया सारख्या देशांमध्ये जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करून मोठे उच्चशिक्षित व्हावे असे मोरे शेवटी म्हणाले. त्यानंतर जयवंत मरसाळे व संजय खरोटे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता साळुंके यांनी शाळे बाबत माहिती देतांना म्हणाल्या की आम्ही शाळेचे वर्ग रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी असे वातावरण निर्माण केले असून आमच्या शाळेची ३ विद्यार्थी बीटीएस परीक्षेत व २ विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दहा लाख रुपयांच्या लॅबची उभारली केली असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान व ते कसे हाताळावे याबाबत लॅब ची निर्मिती केली आहे तसेच आमच्या शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न सुरू आहे आमचे सर्व शिक्षक हे राज्यपुरस्कार मिळालेले आहे असे साळुंखे मॅडम शेवटी म्हणाल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक माणिक कदम यांनी केले तर उपस्थित आमचे आभार शंकर बिऱ्हाडे यांनी मानले.

गीता प्रशाला व कोपरगाव नगरपालिका शाळा क्र 6  या शाळेतील 300  गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत करण्यात आले यावेळी थोरात सर,पाखरे मॅडम वव्हाळ सर यावेळी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे